बाईक स्फोटातील 'त्या' पोलिसाचा मृत्यू

रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात काल झालेल्या दुचाकी स्फोटात जखमी पोलीस कर्मचारी निकेश पाटील यांचा मृत्यू झालाय. सकाळी त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले. 

Updated: Oct 29, 2015, 01:58 PM IST
बाईक स्फोटातील 'त्या' पोलिसाचा मृत्यू title=

अलिबाग : रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात काल झालेल्या दुचाकी स्फोटात जखमी पोलीस कर्मचारी निकेश पाटील यांचा मृत्यू झालाय. सकाळी त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले. 

अधिक वाचा : रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

बाईक स्फोटात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयातील अती दक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांचा उजवा पायही काढावा लागला होता. मात्र, अखेर रात्री बारा वाजता त्यांची मृत्यूशी झुंज संपली.

काल दुपारी पाटील बाईक सुरु करत असताना हा स्फोट झाला होता. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.