शिर्डी : शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी राज्यात रान उठविलेय. राज्य सरकार विरोधात शेतकरी मोर्चे काढण्यात येत आहे. शिवसेनाही कर्जमाफीवरुन आक्रमक झाली आहे. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमचा कर्जमाफीला विरोध नाही, असे प्रतिपादन केलेय.
मात्र शेतकऱ्याने घेतलेले कर्ज तो फेडू शकतो, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्ग हा शेतक-यांच्या समृद्धीसीठी आहे, असे सांगत कर्जमाफीला आमचा विरोध नाही असं चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सांगितलं.
शेतकऱ्यांचा विरोध मोठा नाही असं सांगत त्यांना आम्ही समजावून सांगू असंही त्यांनी यावेळी सांगितले.