उत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी

परप्रांतियांना मुंबईत रिक्षाची परमिट मिळत असतील तर त्या नव्या रिक्षा जाळा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पण या वादामध्ये आता तेल टाकण्याचंच काम सुरु झालं आहे. 

Updated: Mar 12, 2016, 10:02 PM IST
उत्तर भारतीय नेत्याची राज ठाकरेंना धमकी title=

मुंबई: परप्रांतियांना मुंबईत रिक्षाची परमिट मिळत असतील तर त्या नव्या रिक्षा जाळा असे आदेश राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पण या वादामध्ये आता तेल टाकण्याचंच काम सुरु झालं आहे. 

मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी खुलेआम पत्र लिहून राज ठाकरेंना धमकी दिली आहे. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु अशी धमकी कंबोज यांनी दिली आहे. 

तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी लिहिलं आहे. मनोज कंबोज यांनी धमकीचं हे पत्र फेसबूकवरही टाकलं आहे. 

दरम्यान रिक्षांबाबतचं मनसेचं आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे.