दिवावासियांचा मोर्चा भाजपने चिरडला

दिवावासियांच्या विविध मागणीसाठी आज ठाणे महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु दिवावसियांचे आंदोलन भाजपनेच चिरडल्याच चर्चा सुरु आहे.

Updated: Sep 14, 2016, 05:19 PM IST
दिवावासियांचा मोर्चा भाजपने चिरडला title=

ठाणे : दिवावासियांच्या विविध मागणीसाठी आज ठाणे महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु दिवावसियांचे आंदोलन भाजपनेच चिरडल्याच चर्चा सुरु आहे.

दिवा येथून स्थानिक भाजपचे पधादिकारी रोहिदास मुंढे यांच्या नेतृत्व खाली काढण्यात आलेल्या मोर्चाच्या गाड्या दिवा आणि खारेगाव परिसरातच अडविण्यात आल्यामुळे तिथूनच आंदोलन चिरडण्यास सुरुवात झाली. 

त्यातच पालिका मुख्यालय समोर बाप्पाची मूर्ती बसविण्यासाठी येणाऱ्या रोहिदास मुंडे याना पालिकेच्या रस्त्यासमोरूनच त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच त्याच्या समवेत आलेल्या ५ समर्थकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
दिवा येथून दरवर्षी नगरसेवक निधी तसेच शासनाच्यावतीने येणारे निधी देऊन देखील या ठिकाणी असणाऱ्या डम्पिंग ग्राउंड बरोबरच रस्ते तसेच मूलभूत सुविधा अद्यापही मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या दिवा वासियांनी गेली अनेक वर्ष मोर्चे आंदोलन आणि निषेध करून देखील त्यांना न्याय मिळालेला नाही. याचाच निषेध करण्यासाठी आज ठाणे महानगर पालिकेवर हजारो दिववासीय धडकणार होते. परंतु आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पुढील आंदोलनाचा मार्गच ठप्प झाला.

पालिका मुख्यालय ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु रोहिदास मुंढे आणि त्यांचे समर्थक याना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आंदोलन झालेच नाही. दरम्यान महापालिकेवर मोर्चा काढण्याच्या पूर्वीच दिवावासियांबरोबर बोलणी केली होती. परंतु त्यांनी न ऐकल्यामुळे आंदोलकांवर कारवाई करण्यात आली आहे.