प्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण

वसईत एक महिला आणि तिच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आलीय. किरणकुमार मकवाना यानं प्रेमसंबंधांतून ही हत्या केलीये. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.

Updated: Oct 27, 2015, 04:16 PM IST
प्रेयसी आणि तिच्या मुलाची हत्या करून आरोपी प्रियकर पोलिसांना शरण title=

वसई: वसईत एक महिला आणि तिच्या मुलाची निर्घुण हत्या करण्यात आलीय. किरणकुमार मकवाना यानं प्रेमसंबंधांतून ही हत्या केलीये. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.

वसईत एव्हरशाईनच्या साई सेवा सोसायटीमध्ये सोनाली चव्हाण आपला पती आणि मुलगा कुणालसोबत राहत होती. तिचे आणि किरणकुमारचे प्रेमसंबंध होते. सुरूवातीला किरणकुमार त्यांच्याच घरात राहात होता. मात्र ६ महिन्यांपूर्वी वादावादी झाल्यानं तो बाहेर पडला होता. याच भांडणातून किरणकुमारनं सोनाली आणि कुणाल यांना हातोडी आणि चाकूचे वार करून ठार केलं. 

आणखी वाचा - ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

हत्येनंतर आरोपी स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. तुळिंज पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेचे पती राजकुमार चव्हाण बाहेरगावी गेले असता हा प्रकार घडलाय. पोलीस त्याचीही चौकशी करणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.