आधी केले जातीतून बहिष्कृत, पुन्हा घेण्यासाठी १५ लाखांची लाच

जातीतून बहिष्कृत केलेल्या महिलेला परत घेण्यासाठी १५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे.

Updated: Nov 20, 2014, 02:04 PM IST
 आधी केले जातीतून बहिष्कृत, पुन्हा घेण्यासाठी १५ लाखांची लाच title=

अहमदनगर : जातीतून बहिष्कृत केलेल्या महिलेला परत घेण्यासाठी १५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे.

या प्रकरणी वैदू जातपंचायतीच्या २० जणांविरोधात लोणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या खुनाच्या आरोपावरून शांताबाई शिंदे यांच्यावर वैदू जातपंचायतीनं बहिष्कार टाकला होता.

पतीच्या खुनाच्या आरोपावरून शांताबाई यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली असतानाही जात पंचायतीनं त्यांना अग्नीपरीक्षा द्यायला लावली आणि दोषी ठरवून शिक्षा दिली. त्यांना दोन लाख ३० हजार रुपये दंड करण्यात आला. शांताबाईंनी तो भरलादेखील. मात्र बहिष्कार कायम राहिला.

मुलांच्या लग्नावेळी पुन्हा जातपंचायत आडवी आली. मुलांचं लग्न करायचं असेल, तर पुन्हा जातीत यावं लागेल आणि त्यासाठी १५ लाख रुपये भरावे लागतील, असा आदेश जातपंचायतीने दिला. त्यानंतर शांताबाईंनी पोलिसांत तक्रार दिली. 

दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड्याच्या दलित हत्याकांडाला एक महिना झालाय. मात्र अद्यापही मारेकरी मोकाटच आहेत. ऐन दिवाळीच्या धामधुमीत पाथर्डी तालुक्यात ह्रद्य हेलावून टाकणारी ही घटना घडली होती. एकाच दलित कुटुंबातील आई, वडील आणि तरूण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले होते. या हत्याकांडाला आज एक महिना पूर्ण झाला मात्र अद्यापही आरोपी मात्र मोकाटच आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.