मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. सप्टेंबरपासून तुमचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
रेल्वे बजेटमध्ये केलेल्या तरतूदीनुसार ठाणे ते CST या मार्गाचं डीसी ते एसी परिवर्तन करण्यासाठी मध्य रल्वेने 31 ऑगस्ट ही डेडलाईन ठेवलीय.
हे काम झाल्यावर जुने डबे बाद करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नवीन डबे येण्याबरोबर लोकल सेवांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मार्गावरील तांत्रिक समस्या दूर होतील असा दावा रेल्वेने केलाय. यामुळे रेल्वेची मोठी वीज बचत होणार आहे.
त्यामुळे आता मध्य रेल्वे बाबत प्रवाशांना असलेल्या तक्रारी कमी होतील अशी आशा करूया.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.