डोंबिवलीत चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ cctv कैद

सांस्कृतिक आणि सुशिक्षित असणारी डोंबिवली आता दरोड्यांची नगरी, बनू पाहातेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील 10 दिवसांत जवळपास 15 दरोड्यांच्या घटना परिसरात घडल्यात. झी 24 तासच्या हाती आणखी एक सीसीटिव्ही फुटेज लागलंय.

Updated: Dec 2, 2015, 11:57 AM IST

डोंबिवली : सांस्कृतिक आणि सुशिक्षित असणारी डोंबिवली आता दरोड्यांची नगरी, बनू पाहातेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील 10 दिवसांत जवळपास 15 दरोड्यांच्या घटना परिसरात घडल्यात. झी 24 तासच्या हाती आणखी एक सीसीटिव्ही फुटेज लागलंय.

डोंबिवली पश्चिममधील सुदामा कॉम्लेक्समध्ये दरोडा टाकायला आलेली एक टोळी CCTVमध्ये कैद झाली. त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून ही चड्डी बनियन गॅंग असावी असा संशय व्यक्त होतोय.

CCTV मध्ये एक जण प्रथम आत शिरतो आणि सर्व पाहणी करून येतो. पाहणी झाल्यावर आपल्या साथीदारांना घेऊन पुन्हा वरती सर्व जण जातात.

यात अजून एक गोष्ट म्हणजे या मोहिमेत त्यांच्या हाती काहीच लागत नाही कारण जे घर त्यांनी लक्ष केलं होतं. त्यात काहीच हाती लागत नाही. शेवटी खाली हात जाण्यापेक्षा चक्क इमारतीतील हाती लागलेल्या चपला बूट उचलून या टोळीनं पोबारा केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.