मुख्यमंत्री फडणवीस कारला धक्का मारण्याची वेळ का आली?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली. त्यांच्या धक्का मारण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jul 5, 2016, 03:59 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस कारला धक्का मारण्याची वेळ का आली? title=

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली. त्यांच्या धक्का मारण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस नागपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची गाडी अचानक बंद पडली. त्यांना दुसरी गाडी का देण्यात आली नाही, याची जोरदार चर्चा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ का यावी लागली. याला कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री चक्क त्यांच्याच सरकारी वाहनाला धक्का मारत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केलेय. मात्र, अशी वेळ त्यांच्यावर कशी आली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

आपल्या घरातून नागपूर विमानतळाकडे जात असताना मुख्यमंत्र्यांची सरकारी बुलेटप्रूफ गाडी रस्त्यातच अचानक बंद पडली. त्यावेळी त्यांनी स्वतः खाली उतरून गाडी ढकलली. सुरक्षा रक्षकही मदतीला होते पण गाडी शेवटपर्यंत सुरू न झाल्याने अखेर मुख्यमंत्री भाजपचे आमदार समीर मेघे यांच्या गाडीने विमानतळावर रवाना झाले.