नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

दहावीतील  विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. 

Updated: May 25, 2017, 08:56 PM IST
नाशकात टोळक्याकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या title=

नाशिक : दहावीतील  विद्यार्थ्याची हत्या अज्ञात टोळक्याने केली. या टोळक्याने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. 

१५ वर्षांच्या विद्यार्थ्याचे नाव तुषार साबळे आहे.  या मुलावर प्राणघातक हल्ला केला गेला. या हल्ल्यात तुषार साबळे याचा मृत्यू झाला. अज्ञात टोळक्यानं धारधार शस्त्राने तुषार साबळेवर हल्ला केला.

तीन ते चार गाड्यांमधून आलेल्या हल्लेखोरांनी दहशत माजवत हा हल्ला केला. नाशिक रोडवरच्या मंगलमूर्ती भागात ही हादरवून टाकणारी घटना घडली.