कल्याण : कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.
उद्धव ठाकरे यांची काल कल्याणमध्ये सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाला चांगलाच टोला लगावला.
स्मार्ट सिटी कसे करणार असा प्रश्न गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेले काँग्रेस राष्ट्रवादी विचारत आहेत. तर आमच्या मित्राच्याही पोटात दुखत आहे. आम्ही कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटी करूनच दाखवून असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- राज्यातील सर्वात चांगली स्मार्ट सीटी कोणती असेल तरी कल्याण-डोंबिवली.
- येथील डंम्पिग ग्राऊंडचा जो प्रश्न आहे, तो आम्हीच निकाली काढू, त्याचा आराखडा आमच्याकडे तयार आहे.
- कल्याण-डोंबिवलीला २४ तास पाणीपुरवठा कसा होईल, यावर आमचा भर आहे.
- ज्यांनी १५ वर्ष शहरावर राज्य केलं त्यांना काय केलं. भाजपचा येथे महापौर बसवलात तर त्यांच्या मदतीने या शहराचा विकास होईल.
- जे सत्तेत असतील तर तेच विकास करतील. त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका. आमच्यात विकास करण्याची धमक आहे. आमच्याकडे नियोजन आहे.
- स्मार्ट सीटीबाबत गैरसमज करुन दिला जात आहे. आम्ही केंद्राकडून सहा हजार कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे. त्यामुळे येथे विकासाला चालना मिळेल. त्यासाठी तुम्ही भाजपचाच महापौर बसवा.
- स्मार्ट सिटीचा प्लान यांना कळणार नाही. १५ वर्ष राज्य करुन काय कल्याण केले?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.