चंद्रपूर: नुकसानग्रस्त शेतकरी म्हणून मिळालेली सरकारी मदत परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल आणि कोसंबी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष आणि काका श्रीकृष्ण फडणवीस, ती शेतजमीन कसतात. नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसानग्रस्तांना सरकारी मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार या दोघांच्या बँक खात्यांत, ही सरकारी मदत जमा झाली. आशिष फडणवीस यांना १८ हजार ४५० रुपये, तर श्रीकृष्ण फडणवीस यांना १३ हजार ५०० रुपयांचा धनादेश मिळाला होता. मात्र हे दोन्ही धनादेश, त्यांनी मूल तालुक्याच्या तहसीलदारांकडे जमा केलेत.
नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालेल्या अधिक गरजू शेतकऱ्यांकरता ही रक्कम उपयोगी यावी, म्हणून हे धनादेश परत केल्याचं त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.