...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Updated: Dec 17, 2016, 07:48 PM IST
...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस title=

नागपूर : आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

राज्यात झालेल्या दोन टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकीत भाजने बाजी मारली. त्यामुळे राज्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर भाजपने निवडणूक लढविली आहे. भाजपची वाढलेली ताकद आणि भाजपचे मुंबईच्या विकासासाठीचे व्हिजन हे जर शिवसेनेला मान्य असेल, तरच युती शक्य होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. शिवसेनेला भाजपचा दृष्टीकोन जर त्यांना मान्य असेल तरच युतीचा विचार होऊ शकतो. भाजपचे मुंबईच्या विकासंदर्भातील व्हिजन शिवसेनेला मान्य असेल तरच आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांची युती  होईल, असे स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह उभे आहे.