मतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट

21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. 

Updated: Feb 23, 2017, 08:12 AM IST
मतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट  title=

पुणे : 21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. पुण्यातल्या मल्टीप्लेक्स असोसिएशननं हा निर्णय घेतला आहे. तर मतदान करणाऱ्या पुणेकरांना हॉटेलमध्ये डेझर्ट देण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशननं घेतला आहे. 

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये आता पुण्याच्या मल्टीप्लेक्स आणि हॉटेल असोसिएशननं एक पाऊल पुढे टाकलं आहे.