जळगाव : जमिनीचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने पायउतार झालेले राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मंत्रीमंडळ परतीला लागलेले ग्रहण सुटण्याचे चिन्ह निकट भविष्यात तरी दिसत नाही.
या प्रकरणाचा तपस करणाऱ्या झोटिंग समितीने परत एकदा मुदतवाढ मागितली आहे. 23 जूनपासून कार्यभार सूर केलेल्या समितीला तीन महिन्यात तपास पूर्ण करून अहवाल सरकारला द्यायचा होता. मात्र तसे झाले नाही म्हणून या आधी समितीला दोन महिन्याची मुदतवाढ दिली होती.
ही मुदतवाढ 23 नोव्हेंबरला संपली असली तरीही समितीचा अहवाल पूर्ण झाला नसल्याने परत एकदा समितीने परत एकदा मुदतवाढ मागितली आहे.
दरम्यान, मंत्रिपद सोडून सहा महिने उलटले तरी एकनाथ खडसेंना सरकारी बंगला रामटेक सोडण्याची इच्छा होत नसल्याचं उघड झालंय. एकनाथ खडसेंनी अजून रामटेक बंगला सोडला नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय.
एवढंच नव्हे तर बंगल्याच्या भाड्याचे साडे पंधरा लाखही खडसेंनी दिलेले नसल्याचं पुढं आलंय.