जळगाव : सहकार राज्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील शिवसेना नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर बरसले.
एकनाथ खडसे यांच्या विरोधात बोलायला मी घाबरत नाही. राजीनामा का दिला याबाबत खडसे यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
राजीनामा दिल्यानंतर पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा दिला असे खडसे कधी सांगतात तर कधी मीडिया ट्रायलमुळे राजीनामा द्यावा लागला, अशी व्यक्तव करतात. त्यामुळे खडसे यांनी एकाच भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे असा टोलाही पाटील यांनी लगावला.