शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Updated: Dec 13, 2014, 06:36 PM IST

 

नाशिक : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

अवकाळी पावसामुळे उभी पीकं भुईसपाट झाली आहेत. गारपीटीनं भाजीपीकांचं मोठं नुकसान झालेय. त्यामुळे आवक घटल्य़ानं भाज्या महागल्या आहेत. नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी नाशिकमध्ये गारपीटग्रस्त शेतक-यांनी रास्ता रोको केलाय. गारपीटीनं येथील द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तातडीनं नुकसानभरपाई देण्याची मागणी करत या शेतक-यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला.

अवकाळी पावसाने भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसाने बाजारसमितीत सर्वच भाजीपाल्याचे नुकसान झालंय. नाशिक बाजारसमितीत मेथी, कोथिंबीर, पालक, हिरव्या पालेभाज्यांची आवक घटली आहे. टोमॅटो, भोपळा, गिलके, दोडके सारख्या फळभाज्याही महागल्या आहेत.

दोन दिवसात पालेभाज्याचे दर वीस ते पंचवीस टक्के वधारल्याने सर्व्साम्न्यांना याचा फटका बसणार आहे. मुंबाई मराठवाडा आणि गुजरातला नाशिकमधून भाजीपाला पुरवला जातो त्यामुळे सर्वच महानगरांमध्ये भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.