इसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार?

इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

Updated: Nov 26, 2014, 04:26 PM IST
इसिसमध्ये गेलेले कल्याणचे ‘ते’ चौघं लवकरच परतणार? title=

कल्याण: इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघंही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ते केव्हाही भारतात परतू शकतात, यासाठी दूतावासातील अधिकाऱ्यांनीही तयारी चालवली असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली. भारतात परतल्यावर आपल्याला धोका होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळं परतल्यावर सुरक्षेबाबत ते साशंक असल्याचंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 

कल्याणमधील आरिफ माजिद, फहाद शेख, अमान तांडेल आणि सहीम टंकी या चार तरुणांनी २५ मे रोजी इतिहाद विमानानं बगदाद गाठल होतं. त्यानंतर हे चौघंही बेपत्ता होते. इराकमध्ये धुडगूस घालत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेत ते सामील झाल्याची माहिती गेल्या काही दिवसांत पसरली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक याचा तपास करत होते. 

२६ ऑगस्ट रोजी सहीम यानं त्याच्या भावाला आरिफचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचं फोनवरून कळवलं होतं. आरिफच्या वडिलांनी मात्र तो जिवंत असल्याचा दावा केला होता. आपल्याला त्याचा फोन आला होता आणि तो भारतात परत येऊ इच्छितो अशी अपेक्षाही व्यक्त केली होती, असंही त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं होतं. 

या चौघांची त्यांच्या कुटुंबाशी भेट घालून देण्यासाठी गृहखात्यानंही तयारी चालवल्याचं पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.