नागपूर: नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
नागपूरमधल्या जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच भागातल्या तरुणांनी गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची, या मुलीची तक्रार आहे. मात्र पोलिसांनी आपल्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा तिच्या आईचा आरोप आहे.
याबाबच पोलिसांकडे विचारणा केली असता 'पीडित पहिल्यांदा आली तेव्हा काहीच माहिती दिली नाही. त्यानंतर चार दिवसांनंतर येऊन आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिनं सांगितलं. याप्रकरणी आमचा तपास सुरू आहे', असं पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी सांगितलं.
या प्रकरणी शिवसेनेनं थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर, कारवाईची चक्र फिरली. या घटनेतल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन न्याय मिळावा, ही पीडितेची मागणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.