'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Updated: Sep 15, 2015, 06:42 PM IST
'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?' title=

मुंबई : दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

नाशिक कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी पाणी सोडण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे. या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला हायकोर्टानं सरकारला दिलाय. 18 सप्टेंबरपर्यंत शाही स्नानासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी करण्यात येण्यासाठी पुन्हा एकदा विचार करा, असं हायकोर्टानं म्हटलंय. 

अधिक वाचा - दुसरं शाही स्नान : १७ लाख भाविकांची डुबकी

एखाद्या धार्मिक कार्याकरता पाणी वाया घालवणं योग्य नाही, अशी याचिका एच. एम. देसरडा यांनी दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टानं स्वीकार केलीय. देसरडा हे पुण्यात अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून काम करतात. 

अधिक वाचा - दुसरे शाहीस्नान : भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

कुंभमेळा 14 जुलै रोजी सुरु झाला होता तो 18 सप्टेंबर रोजी संपुष्टात येईल. या कुंभमेळ्यात प्रत्येक शाही स्नानासाठी 1000 दशलक्ष क्युबिक पाणी सोडण्यात येतंय. यासंबंधी पुढची सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.