रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे. 

Updated: Jul 28, 2014, 01:20 PM IST
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली title=

रायगड: रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे. 

सर्वाधिक पाऊस पाली आणि खालापूर या दोन तालुक्यात झालाय. खोपोली, पाली भागातील जिल्हा परिषदेच्या सर्वच खाजगी शाळांना सुट्टी दिली आहे. आंबा, पाताळगंगा, सावित्री, कुंडलिका नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. पाताळगंगा नदीनं धोक्याची पटली ओलांडली असून नदी काठच्या सर्वच गावांना खालापूर तहसिल प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर जांभूळपाडा इथून वाहणारी आंबा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय. त्यामुळं जांभूलपाडा पुलावरून पाणी जाण्याचा धोका निर्माण झालाय. 
 
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुद्धा वाहतूक धीम्या गतीनं आहे. वाहतुकीमध्ये पावसाचा अडथळा निर्माण झालाय तर तिकडे खोपोली शहराच्या काटरंग आणि शिळफाट्यावरील सखल भागात नाल्याचं पाणी शिरलं होते. पेण, खोपोली रस्त्यावरील डोनवत धरण पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलंय. नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजून पूर्ण भरले नाहीय. मात्र भातशेती पाण्याखाली गेली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.