मुंबई: भाजपचे उत्तर भारत मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज यांना मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना पत्र लिहून कंबोज यांनी धमकी दिली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.
मालाडमध्ये एका कार्यक्रमाला कंबोज आले होते, तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. हल्ला करणाऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु, असं या पत्रात लिहण्यात आलं आहे.
तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी लिहिलं आहे. मनोज कंबोज यांनी धमकीचं हे पत्र फेसबूकवरही टाकलं आहे.