आयपीएलवर सट्टा लावणारं रॅकेट उद्धस्त

नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून ८ जणांना अटक केली आहे.

Updated: May 18, 2017, 02:25 PM IST
आयपीएलवर सट्टा लावणारं रॅकेट उद्धस्त

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारे रॅकेट नाशिक पोलिसांनी उध्वस्त केलं आहे. नाशिकच्या वडाळा रोडवरील विधातेनगर मधल्या बंगल्यातून ८ जणांना अटक केली आहे.

आरोपींकडून  टीव्ही, ३ लपटॉप, ७९ मोबाईल, 2 पेन ड्राइव्ह असा ४ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यामध्ये नागपूरचे ५, बिहारचे २ गोंदीयाच्या एकाचा जणाचा समावेश आहे.

या प्रकरणी मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता आणि हैद्राबाद संघाच्या सामन्या दरम्यान हा सट्टा खेळला जात होता, अत्याधुनिक साधनांचा वापर करून हा सट्टा खेळला जात होता.