पतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार

पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं जात पंचायतीचं भूत अजूनही उतरायला तयार नाही. मात्र याविरोधात बंड पुकारण्या-या एका तरुणीलाच जातीतून बहिष्कृत केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात घडलीय. 

Updated: Jan 1, 2016, 07:56 PM IST
पतीच्या निधनानंतर प्रथेच्या नावावर झाले पत्नीवर अत्याचार title=

येवला : पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं जात पंचायतीचं भूत अजूनही उतरायला तयार नाही. मात्र याविरोधात बंड पुकारण्या-या एका तरुणीलाच जातीतून बहिष्कृत केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात घडलीय. 

कोमल वर्दे असं या मर्दानी तरुणीचं नाव असून ती काशीकापडी या जातीतली आहे. वडलांच्या निधनानंतर कोमलच्या विधवा आईवर रूढी परंपरेच्या नावाखाली जातीतल्या लोकांकडून अत्याचार करण्यात आले. मात्र याला कोमलनं तीव्र विरोध दर्शवला मात्र त्याला न जुमानता जातीच्या लोकांनी हा सर्व संतापजनक प्रकार रेटून नेला. 

काशीकापडी जातीत पतीच्या निधनानंतर मृतदेहासोबतच विधवेच्या डोक्यावर तूप लावून आंघोळ घातली जाते, धार्मिक विधी करताना तिची समजतील इतर विधवा महिलाकडून ने-आण केली जाते, दशक्रिया विधीच्या दिवशी, तिला अंघोळ घातली जाते सर्वासमोर तिचा साज उतरविला जातो तिला घरी नेतांना तीचं तोंड कोणीही बघत नाही. 

सरते शेवटी तिला एका अंधारखोलीत रात्रभर डांबून ठेवतात. अशा या अघोरी प्रथेविरोधात आता कोमलनं बंड पुकारल्यामुळं तिलाच जातीतून बहिष्कृत करण्यात आलंय. मात्र कोमलनं याविरोधात लढा उभारला असून तिला समाजाचा पाठिंबा हवाय.