आभाळाने बाप हिरावला, पण नानांनी मुलींचे कन्यादान केले

दुष्काळी परिस्थितीमुळे जीवतोड मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच आले नाही, आभाळाने बाप हिरावला, मात्र अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. 

Updated: Jan 7, 2016, 08:15 PM IST
आभाळाने बाप हिरावला, पण नानांनी मुलींचे कन्यादान केले title=

बीड : दुष्काळी परिस्थितीमुळे जीवतोड मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच आले नाही, आभाळाने बाप हिरावला, मात्र अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. 

मकरंद अनासपुरे भावाच्या भूमिकेत
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणाऱ्या, नाम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भावाची भूमिका निभावली. नाम फाऊंडेशनने बीड तालुक्यातील लोळदगाव दत्तक घेतले आहे, या गावात हा सामूहिक विवाह सोहळा झाला.

लग्नात वधू-वरांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपयांची भांडी भेट म्हणून देण्यात आली. आत्महत्याग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या २३ मुलींच्या डोक्यावर १० हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत नाना आणि मकरंद यांनी अक्षता टाकल्या.

नानांचे भावूक उद्गार
लग्नसोहळ्यात मी पित्याच्या, तर मकरंद भावाच्या भूमिकेत आहे. एकाचवेळी इतक्या मुली आणि जावई मिळाले यापेक्षा भाग्याचा क्षण कोणता, असे भावूक उद्गार अभिनेता नाना पाटेकर यांनी यावेळी काढले.