कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा

लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी आज अखेर आपला राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. माळवी उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

Updated: Feb 1, 2015, 12:15 PM IST
कोल्हापूरच्या लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा title=

कोल्हापूर: लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांनी आज अखेर आपला राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. माळवी उद्या महापालिका आय़ुक्तांकडे महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात महापौर तृप्ती माळवी यांना १६ हजारांची लाच रंगेहाथ पकडलं. माळवी यांनी ४० हजाराची लाच मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यातील १६ हजाराची रक्कम घेतांना तृप्ती माळवी यांना एसीबीनं रंगेहाथ पकडलं.
 
तृप्ती माळवी यांची अटक टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रकृती बिघडल्याचं कारण देत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच माळवी यांना अटक करू असं पोलिसांनी सांगितलं.
 
मध्यरात्री महिला आरोपींना अटक करता येत नसल्यानं माळवींना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं होतं. मात्र अटक टाळण्यासाठी तृप्ती माळवी यांनी प्रकृती बिघडल्याचं कारण पुढे केलं आहे. राजारामपुरी भागातील मोरया हॉस्पिटलमध्ये माळवींना दाखल करण्यात आलं आहे.
 
ऑगस्ट २०१४ मध्ये कोल्हापूरच्या ४१व्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तृप्ती माळवी यांची बिनविरोध निवड झाली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.