लाचखोर महापौर तृप्ती माळवी १६ फेब्रुवारीला देणार राजीनामा

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवीनं आजही राजीनामा न दिल्यामुळं कोल्हापूरकर संतप्त झालेत. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती मात्र महापौर तृप्ती माळवीनं राजीनामा दिलेला नाही.

Updated: Feb 9, 2015, 11:05 PM IST
लाचखोर महापौर तृप्ती माळवी १६ फेब्रुवारीला देणार राजीनामा title=

कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवीनं आजही राजीनामा न दिल्यामुळं कोल्हापूरकर संतप्त झालेत. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती मात्र महापौर तृप्ती माळवीनं राजीनामा दिलेला नाही.

आपण १६ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभेत राजीनामा देऊ, आपली मानसिक स्थिती चांगली नसल्यानं राजीनामा दिला नाही, असं तृप्ती माळवी यांनी सांगितलंय. 

तृप्ती माळवीला १६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. मात्र तरीही त्यांनी लाच घेतल्याचा आरोप फेटाळलाय. आपल्याविरोधात षडयंत्र करण्यात आल्याचा दावा माळवीनं केलाय. 

विशेष म्हणजे आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीचा महापौरपदाचा कार्यकाळ संपलाय. त्यानुसारही महापौरांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं मात्र राजीनामा दिलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.