धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू

 प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

Updated: Sep 22, 2016, 09:52 PM IST
धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू title=
संग्रहित छाया

धुळे : जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तब्बल सहा तास हे आंदोलन सुरु होते. तरुणाला मारहाण करून ठार मारणाऱ्या आणि त्यामागे कारणीभूत असलेल्या दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 

या खून प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मात्र सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शव स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला. पोलीस प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु होता.