माणिकरावांचा रावसाहेबांविषयी गौप्यस्फोट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. 

Updated: Feb 7, 2015, 03:42 PM IST
माणिकरावांचा रावसाहेबांविषयी गौप्यस्फोट title=

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. 

रावसाहेब दानवे यांना जेव्हा केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा ते नाराज होते, म्हणून ते भाजपातून काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे वक्तव्य नागपुरात केलं आहे.

रावसाहेब दानवे यांची नुकतीच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. यानंतर रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे, त्या दरम्यान माणिकराव ठाकरे यांनी हा गौप्यस्फोट केल्याने रावसाहेब दानवे त्यांना काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.