मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.

Updated: Dec 23, 2014, 07:39 PM IST
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा title=
संग्रहीत

नागपूर : मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.

दरम्यान, मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन विधेयकच मंजुर करुन घेतले. मात्र या नव्या विधेयकात मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी कामकाजावर बहिष्कार टाकला.

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा हा मुद्दा खोडून काढताना कायदेशीरबाबी तपासून मुस्लिम आरक्षणाबाबात भूमिका घेतली जाईल, असं वक्तव्य केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.