नाशिक मनसेमध्ये फूट, माधवी जाधवांचा दे धक्का

पालिका प्रभाग समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. मनसेत फूट पडल्याचे दिसून आली.

Updated: Apr 9, 2015, 01:46 PM IST
नाशिक मनसेमध्ये फूट, माधवी जाधवांचा दे धक्का  title=

नाशिक : पालिका प्रभाग समिती निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत मनसेला जोरदार धक्का बसला. मनसेत फूट पडल्याचे दिसून आली.

नाशिक मनसेमध्ये आलबेल चालल्याचे दिसत आहे. माजी महापौर यतीन वाघ यांनी पक्षादेश धुडकावला. त्यामुळे मनसेतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर आली. प्रभाग समिती निवडणुकीत मनसेला दणका मिळाला. पक्षाचे आदेश झुगारून माधवी जाधव अध्यक्षपदी या अध्यक्षपदी निवडून आल्यात.

माधवी जाधव यांना शिवसेना आणि भाजपने पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मनसेच्या माधवी जाधव या प्रभाग समिती अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात. दरम्यान, पक्षाचा व्हिप न पाळल्याने ठाण्यातील नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.