पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'

पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

Updated: Jun 21, 2015, 09:44 PM IST
पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग' title=

पुणे : पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

पुणे आणि साताऱ्यात पावसाचा जोर जरा जास्त आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्येही रविवारी सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत.

हुलकावणी देणार मान्सून मुंबईसह कोकण आणि विदर्भात सक्रीय झाला होता, मात्र महाराष्ट्रात बरसत नव्हता. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये नुसतेच ढगाळ वातावरण होते. दिवसातून काही वेळ पावसाच्या अगदी किरकोळ सरी पडत होत्या. 

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला या धरणांमध्येही पाऊस पडतो आहे. रविवार सुटीचा दिवस आणि त्यात पाऊस असल्याने पुण्यातील रस्त्यावर वाहतूकही कमी आहे.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी, वाई आणि महाबळेश्वरमध्येही रविवार सकाळपासून संततधार पाऊस पडतो आहे. कोयना, धोम, बलकवडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. 

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे वेण्णा तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये या मोसमात ४०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.