अमरावती : केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने नगरपरिषदांची सत्ता भाजपच्या हाती द्या असे आव्हान करीत भाजप मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. मात्र भाजप नेत्यांच्या सभांना मतदारांनी पाठ फिरविल्याचं चित्र दिसत आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या वरूडमधील जाहीर सभा होती. मात्र या सभेला दोनशे ते तीनशे लोकंच उपस्थित होते. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे भाजपची लोकप्रियता घटली असल्याची चर्चा सर्वत्र रंगलीय. तर विरोधकांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवलाय.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर भाजपचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या संस्थेच्या वाहनात ९१ लाख सापडल्याप्रकरणी अद्याप कोणताही खुलासा पुढे आला नसल्याचं सांगत सत्य लवकरच बाहेर येईल असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.