आईने बॅटने मारल्याने मुलाचा मृत्यू

आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आई राखी बालपांडे हिने आपला १३ वर्षाचा मुलगा चैतन्य बालपांडे याला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

Updated: Aug 6, 2015, 09:19 PM IST
आईने बॅटने मारल्याने मुलाचा मृत्यू title=

पुणे : आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलाला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आई राखी बालपांडे हिने आपला १३ वर्षाचा मुलगा चैतन्य बालपांडे याला बॅटने मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी राखी बालपांडे यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ही घटना टिंगरेनगर भागात घडली.

राखी बालपांडे यांचा पतीशी वाद सुरु होता. घटस्फोटाची केस सुरु आहे. मुलगा कोणाकडे राहणार यावरुन वाद आणखी वाढला. राखी बालपांडेचा पती नागपूरचा आहे. 

राखी या  एका कंपनीत नोकरी करत होत्या, पण मुलाने वडिलांकडे जाण्याचा हट्ट धरल्याने, राखी यांना राग आला, राखी यांनी चैतन्यला बॅटने मारले, पण चैतन्यला वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.