मारहाणीतून कायमस्वरुपी प्रश्न सुटत नाही, खासदार शेवाळेंच मत

 डोंबिवलीत फेरीवाल्यांना मारहाण करणा-या शिवसैनिकांचे त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी कान टोचले आहेत. 

Updated: May 16, 2017, 08:24 PM IST
मारहाणीतून कायमस्वरुपी प्रश्न सुटत नाही, खासदार शेवाळेंच मत title=

डोंबिवली :  डोंबिवलीत फेरीवाल्यांना मारहाण करणा-या शिवसैनिकांचे त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी कान टोचले आहेत. 

फेरीवाल्याना मारून ठराविक काळापुरता प्रश्न सुटेल. मात्र कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचा असेल तर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला संयुक्तपणे काम करावे लागेल असं खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलंय.  

फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेरील फेरीवाल्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण रेल्वेला उपाय सुचवल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, फेरीवाला मारहाण प्रकरणी 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये.