अलिबाग : गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे.
पाच वर्षांपासून या ररस्त्याच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. खुदद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावर जे प्रमुख रस्ते आहेत त्यातील हा महत्वाचा मार्ग. परंतु 5 वर्षात 30 टककेदेखील काम झालेलं नाही.
पाच वर्षे काम रखडलेला राज्यातील हा बहुदा पहिलाच राष्ट्रीय महामार्ग असावा. आज या रस्त्यांवर जे खडडयांचं साम्राज्य पसरलंय त्यातून वाहन चालवणं म्हणजे दिव्यच. गणेशोत्सव तोंडावर आलाय. परंतु रस्त्याची म्हणावी तशी डागडुजी होत नाही. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना मणक्यांचे त्रास वाढीस लागले आहेत.