मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जाम

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनाच्या ८ ते १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Updated: Jun 13, 2016, 05:30 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर जाम title=

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहनाच्या ८ ते १० किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

अमृतांजन पुलाजवळ दुरूस्तीचं काम सुरू असल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

अमृतांजन पुलाजवळ रविवारी कंटेनर उलटला होता. हा कंटेनर मुंबईहून पुण्याकडे जात होता, मात्र अपघातात त्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारा रस्ताही रोखला होता.

अखेर त्याला पुण्याकडे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याने काढण्यात यश आलं होतं, या दरम्यान एक्स्प्रेस हायवेचं आणि कठड्यांचं नुकसान झालं होतं, ते दुरूस्तीचं काम सध्या सुरू आहे.