नागपूर: नागपूर मेट्रोच्या नवनिर्माण कार्याच्या दृष्टीनं आज खऱ्या अर्थानं सुरवात झाली आहे. नागपुरात आज मेट्रोच्या वेब साईटचं आणि लोगोचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.
नागपूर मेट्रोला 'माझी मेट्रो' असं नाव देण्यात आलं असून येत्या तीन वर्षात नागपूर मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील इतर मेट्रो प्रकल्पा पेक्षा नागपूरमध्ये मेट्रो जरी उशिरा आली असली तरी त्याचं काम लवकर होणार असून त्यासाठी नागपूरच्या जनतेसमोर कुठलीही समस्या उभी केली नाही. तसंच नागपूरमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी देखील मेट्रोला पाठींबा दिला असून, मेट्रो ही कुठल्या पक्षाची नाही किवा सरकारची नाही ती जनतेची आहे. त्यामुळं नागपूर मेट्रोचं काम गतीनं होईल आणि वेळेत मेट्रो नागपूरमध्ये धावेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.