नागपूर : शहरातील इमामवाडा भागात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना ४८ तास उलटून गेल्यानंतरही अटक होऊ शकलेली नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपीचं रेखाचित्र तयार केले आहे.
आरोपींच्या शोधाकरिता २० पथकं आणि सुमारे १२५ अधिकारी कामाला लागले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या १२ संशयितांची DNAचाचणीही केली आहे. २० तारखेच्या संध्याकाळी आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर बलात्कार केला गेला होता.