बीड : गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडाच्या खालीच होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. यानंतर महंत नामदेव शास्त्रींनीही आपला सूर बदललाय.
'पंकजा आमच्यासाठी माहेरवाशीण आहे. आम्ही तिचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत... तिच्यासाठी जेवणाचं ताट तयार आहे... दोन घास खावेत आणि जावं' असं नामदेव शास्त्रींनी म्हटलंय.
आत्तापर्यंत मात्र त्यांनी भगवानगडाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना राजकीय भाषण करू द्यायला विरोध दर्शवला होता.