दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन

सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं. 

Updated: Sep 6, 2015, 10:57 AM IST
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र येण्याचं नानाचं राजकारण्यांना आवाहन title=

लातूर: सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना राजकीय पक्षांनी आपापसात भांडण्याऐवजी, या कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन अभिनेता नाना पाटेकर यांनी केलं आहे. या राजकीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी आपण स्वतः बोलणार असल्याचंही नाना पाटेकर यांनी लातूरमध्ये सांगितलं. 

आणखी वाचा - शेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करा : शरद पवार

आज लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जवळपास ८७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्यात आली. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी लातूरमध्ये ही मदत दिली. मात्र यावेळच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं ते व्हॉट्स अपवरचे दोन ग्रुप. 

'छुपा रुस्तुम'ची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लाखोंची मदत

'छुपा रुस्तम' नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपनं तब्बल १ लाख ८० हजारांची रक्कम जमा केली. तर अंबाजोगाई इथल्या महात्मा बसवेश्वर कॉलेज ऑफ इंजिनअरींगच्या शैक्षणिक वर्ष २००० मधल्या तुकडीच्या तरुणांनी, व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे १ लाख रुपयांचा निधी जमा केला. हा निधी लातूरमधल्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांच्या हस्ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबियांना देण्यात आला. 

तर नाना पाटेकर यांनी या दोन्ही ग्रुपच्या या सामाजिक जाणिवेचं कौतुक केलं. यावेळी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात २०१४ आणि २०१५ या वर्षात आत्महत्या केलेल्या ११३ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. 

आणखी वाचा - "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.