नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 ऑगस्टपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी नागपुरातील मेट्रोचं भूमीपूजन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
नागपुरातील मेट्रो प्रकल्प हा एकूण 41 किलोमीटरचा आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने या प्रकल्पाचं सर्वेक्षण केलंय.
नागपूर मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावर 18 स्टेशन्स असतील, तर पूर्व-पश्चिम मार्गावर एकूण 19 स्टेशन्स असतील.
हा प्रकल्प एकूण 9 हजार कोटीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात आणखी काही जागेचं भूसंपादन करावं लागणार आहे.
हा मार्ग फार थोड्या ठिकाणी भूयारी असेल. यात बँकेचं कर्ज 50 टक्के असणार आहे. 20 टक्के केंद्राचा, तर 20 टक्के वाटा राज्य सरकार उचलणार आहे. नागपूर महापालिकेचाही 5 टक्के वाटा असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.