नवी मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई पोलिसांनी बनावट विदेशी मद्य बनवणा-या कारखान्यावर छापा मारून उद्ध्वस्त केलाय.
तळोजातील सिद्धी करवली गावात पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी हा कारखाना चालवणाऱ्या योगेश पाटील आणि सुरेश पाटील दोघांना अटक केली असून दीड लाख रूपयांचा बनावट मद्य साठाही जप्त केलाय.
आरोपी ऊँची विदेशी मद्याच्या बाटल्या आणि झाकणं भंगारातून विकत घेत असत. त्यानंतर त्यात तयार केलेली बनावट दारु आणि पाणी भरून मशीनच्या साहाय्यानं ह्या बाटल्या सीलबंद करुन त्या चढ़या किमतीला विकल्या जात होत्या.