'इंग्रजी हटाव सेने'ची गरज, इतर सेनांना अर्थ नाही'

कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेविषयी वक्तव्य केलं आहे.

Updated: Apr 3, 2016, 08:42 PM IST
'इंग्रजी हटाव सेने'ची गरज, इतर सेनांना अर्थ नाही' title=

पुणे : कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेविषयी वक्तव्य केलं आहे. ज्ञानपीठ विजेत भालचंद्र नेमाडे यांनी, आज 'इंग्रजी हटाव सेने'ची गरज असल्याचं म्हटलं आहे. 

इतर सेनांना काहीही अर्थ नाही. मराठी शाळा कमी होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा लौकिक कमी होतो आहे, असंही नेमाडेंनी म्हटलं आहे. 

आपली समज कमी झाली आहे. मराठी भाषा ही जगातील सातव्या-आठव्या क्रमांकाची भाषा आहे, पण भारतात इंग्रजीलाच जास्त महत्त्व आहे. प्रत्यक्षात इंग्रजी ही जागतिक भाषा नाही, असं स्पष्ट मत भालचंद्र नेमाडे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

भालचंद्र नेमाडे यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

'आठव्या शतकापर्यंत जाती या पक्‍क्‍या स्वरूपात नव्हत्या. इंग्रजांनी त्या पक्‍क्‍या केल्या. सध्याच्या काळात क्षुल्लकपणा वाढला आहे. प्रत्येकाची जातीनिहाय आणि स्वतः ताबा घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे,' सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी भाष्य करताना नेमाडे यांनी हे मत व्यक्त केले आहे.