निलेश राणेंचा राजीनामा

माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

Updated: Mar 21, 2017, 04:06 PM IST
निलेश राणेंचा राजीनामा title=

रत्नागिरी : माजी मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि काँग्रसेचे माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.

रत्नागिरी जिल्ह्याला पक्षाकडून अध्यक्ष मिळत नसल्यानं राणे नाराज होते. आपल्या राजीनाम्याचं खापर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर फोडलंय.  

अशोक चव्हाण जाणून बुजून अध्यक्षपद देत नसल्याचं कारण राणेंनी दिलंय. तब्बल दीड वर्ष रत्नागिरीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मिळाला नसल्याचं सांगत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.


निलेश राणेंचं राजीनामा पत्र


निलेश राणेंचं राजीनामा पत्र

दरम्यान, सोशल मीडियावर नारायण राणे यांच्या पक्षांतराबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच निलेश राणेंचं राजीनाम्याचं पाऊल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलंय.