मुंबई : पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं वृत्त आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा यांनी फेटाळलंय.
'जिल्ह्यामध्ये कुपोषण नाही, मात्र तालुक्यातल्या आदिवासींच्या काही समस्या असतील, तर त्या सोडवल्या जातील' असं ते म्हणाले.
याबाबत 'झी मीडिया'नं वृत्त दिलं होतं. विशेष म्हणजे, जव्हारच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्वतः तालुक्यात 2026 म्हणजे 50 टक्के बालकं कुपोषित असल्याचं मान्य केलं होतं.
मंत्रीमहोदय मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा करतायत. मंत्र्यांना ग्राऊंड रिअॅलिटीचं किती भान आहे? हे यावरून स्पष्ट दिसून येतंय.
मंत्री आपल्या जिल्ह्यात कधी जातात की नाही? याची शंका यावी अशी स्थिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.