नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार

पामबीच मार्गावर पावसामुळं अपघात झालाय. रात्री दोन अपघातांमध्ये चार ठार झालेत. एपीएमसीजवळ कार आणि बाईकमध्ये धडक होऊन दोन जण ठार झाले. तर पामबीच रोडवर कार डिव्हायडरवर धडकल्यानं दोघांचा जीव गेला. 

Updated: Jul 24, 2015, 10:27 AM IST
नवी मुंबईतील दोन भीषण अपघातांमध्ये चार ठार title=

नवी मुंबई: पामबीच मार्गावर पावसामुळं अपघात झालाय. रात्री दोन अपघातांमध्ये चार ठार झालेत. एपीएमसीजवळ कार आणि बाईकमध्ये धडक होऊन दोन जण ठार झाले. तर पामबीच रोडवर कार डिव्हायडरवर धडकल्यानं दोघांचा जीव गेला. 

पहिल्या घटनेत रात्रीच्या सुमारास पनवेलवरुन एक अल्टो कार वाशीच्या दिशेनं येत होती. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार भरधाव वेगानं येणाऱ्या अल्टो चालकांचं गाडीवर नियंत्रण सुटलं आणि ही गाडी शेजारी असलेल्या झाडाला जाऊन धडकली, ज्यात दोघांना जागीच मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की गाडीतील २ प्रवाशांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोकांना एक तास लागला.
 
तर दुसरीकडेच पाम बीच रोड रस्त्यावर भरधाव वेगानं येणाऱ्या इनोव्हा गाडीनं बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिल्यामुळं अपघात घडला. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस या दोन्ही प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.