छगन भुजबळांना दिलासा नाही

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.

Updated: May 11, 2016, 04:33 PM IST
छगन भुजबळांना दिलासा नाही title=

मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई सेशन्स कोर्टानं या दोघांच्याही कोठडीत वाढ केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची कोठडी संपत होती, त्यामुळे ईडीनं या दोघांची कोठडी वाढवून द्यायची मागणी केली. तपासामध्ये गती होत नसल्यामुळे अखेर न्यायालयानं या दोघांचीही कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला.