आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

Updated: Jan 17, 2015, 11:34 PM IST
आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार title=

सांगली : राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी टोलविरोधी आंदोलनाची हाक दिली आहे. यावर टोला लगावताना अजित पवार यांनी आपल्या शैलीत टीका केली. 

राज्यात आता भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. टोल बंद करु अशी हाक निवडणुकीत दिली होती. मात्र, टोल बंद न होता नव्याने खारघर येथील टोल सुरु करुन आपला राज्य सरकारने इरादा स्पष्ट केलाय. तर कोल्हापुरातील टोल बंद होण्याचे नाव घेत नाही. राज्यात टोल धाड सुरुच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

असे असताना आता शोभाताई फडणवीस यांनी टोल आंदोलनाची हाक दिली आहे. तीही आपल्याच सरकारविरोधात. याचा अजित पवार यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.