औरंगाबादेत एमआयएमचा ओवैसीसमोर राडा

एमआयएममधील वाद पुन्हा समोर आलाय तो देखील पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या समोर. पालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून हा राडा कार्यकर्त्यांमध्येच झाला.

Updated: Apr 16, 2015, 11:18 AM IST
औरंगाबादेत एमआयएमचा ओवैसीसमोर राडा title=

औरंगाबाद : एमआयएममधील वाद पुन्हा समोर आलाय तो देखील पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या समोर. पालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून हा राडा कार्यकर्त्यांमध्येच झाला.

असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत पक्षाचे स्थानिक नेते जावेद कुरैशी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम सुरु असताना पक्षाने तिकीट नाकारलेल्या उमेदवारांचा एक गट जाब विचारायला आला असता अचानक दोन गट आपपसात भिडले. 

अखेर भांडण मिटवायला असोसुद्दीन ओवैसी यांना मध्यस्ती करावी लागली. या भांडणात दोन कार्यकर्ते जखमी झालेत. ऐन निवडणुकीत तिसऱ्यांदा अंतर्गत वाद चव्हाटयावर आल्याने याचा फटका एमआयएमला निवडणुकीत बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.